रोटरीच्या लीग क्रिकेट सामन्यांमध्ये रंगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीच्या लीग क्रिकेट सामन्यांमध्ये रंगत
रोटरीच्या लीग क्रिकेट सामन्यांमध्ये रंगत

रोटरीच्या लीग क्रिकेट सामन्यांमध्ये रंगत

sakal_logo
By

मुलुंड, ता. ३१ (बातमीदार) ः ऑफशॅाट्स आयोजित व रोटरी क्लब ऑफ मुलुंड पुरस्कृत सोसायटी लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन २७, २८ आणि २९ मे या तीन दिवशी करण्यात आले होते. एकूण ५६ संघांनी या सामन्यांमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये ३६ पुरुष, १० महिला आणि १० मुलांच्या संघांचा समावेश होता. ही स्पर्धा २७, २८, २९ मे या तीन दिवशी कालिदास क्रीडा संकुल- मुलुंड पश्चिम येथे घेण्यात आली. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले.

तांबे नगर सोसायटीच्या संघांनी या स्पर्धेत सर्व तिन्ही गटांत विजेतेपद पटकावले. उपविजेते मणिभद्र (पुरुष), एटमॉस्फेयर (महिला) आणि एलआयसी (मुले) ठरले. रोटरीचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक अशोक महाजन यांनी प्रदर्शनी सामन्यात भाग घेतला. रोटरी क्लब ऑफ मुलुंडचे अध्यक्ष अश्विन मालदे व विशाल ठक्कर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
हे क्रिकेट सामने पाच पाच षटकांचे होते. कालिदास ओपन ग्राऊंडमध्ये झालेल्या या सामन्यांमध्ये वुमेन्स क्रिकेट फायनल स्पर्धा ॲटमॉस्फियर आणि तांबे नगर वुमेन्स टीम यांच्यामध्ये झाली. अंतिम सामन्यांमध्ये ॲटमॉस्फियर क्रिकेट टीमने प्रथम फलंदाजी करत ४० धावा बनवल्या. तांबेनगर टीमने फक्त अडीच षटकांत मध्ये ४१ धावा करून विजेतेपद पटकावले. तांबे नगर वुमेन्स टीमला रोख रुपये २५ हजार आणि ट्रॉफीने गौरवण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84304 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top