साहित्यातून आत्मीय सुख मिळते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यातून आत्मीय सुख मिळते
साहित्यातून आत्मीय सुख मिळते

साहित्यातून आत्मीय सुख मिळते

sakal_logo
By

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : आज अनेक ठिकाणी साहित्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून आधुनिक असे नवे विचार जनतेसमोर येत आहेत. आज माणसाला जगण्यासाठी नवी ऊर्जा देणारे आत्मीय सुख म्हणजेच साहित्य आहे. कारण साहित्यातून माणूस विचार घेऊन नवे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. साहित्यातून माणसाला आनंद तर मिळतोच, परंतु आपल्या जगण्याची कला आपोआपच शिकत असतो. म्हणून आज साहित्याची उपासना ही अतिशय महत्त्वाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी घणसोली येथे केले.

साहित्यिक व कवी शांताराम लोखंडे यांच्या कोंडिबाचा वड या कथासंग्रहाचे प्रकाशन कर्णिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तेथे कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, रमेश कीर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मोहन भोईर, शिवसेना शहराध्यक्ष द्वारकानाथ भोईर, ह.भ.प. सुनील रानकर, प्रा. अजित मगदूम, कवयित्री दमयंती भोईर, वृषाली मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते. कोंडिबाचा वड या कथेला पुरस्कार मिळाल्यानंतर आपण हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले, असे शांताराम लोखंडे यांनी सांगितले. या वेळी ह.भ.प. सुनील रानकर यांनीही लोखंडे यांच्या साहित्याचा आणि मराठी साहित्याचा आशय मांडला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84309 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top