सचिव खात्यातून प्रदीप खरात सेवानिवृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिव खात्यातून प्रदीप खरात सेवानिवृत्त
सचिव खात्यातून प्रदीप खरात सेवानिवृत्त

सचिव खात्यातून प्रदीप खरात सेवानिवृत्त

sakal_logo
By

मालाड, ता. १ (बातमीदार) ः मुंबई महापालिका सचिव खात्यात कार्यरत असलेले प्रदीप लक्ष्मण खरात हे मंगळवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. ३६ वर्षं पाच महिने एवढ्या प्रदीर्घकाळ त्यांनी सेवा बजावली. त्यांना निरोप देण्याकरिता महापालिका सचिव संगीता शर्मा आणि इतर सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय कामगार नेते व दि म्युनिसिपल युनियन या कामगार संघटनेचे सरचिटणीस रमाकांत बने हेदेखील प्रदीप खरात यांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते.

प्रदीप खरात हे राष्ट्र सेवा दल, मातृ मंदिर-देवरूख, वात्सल्य मंदिर-ओणी, यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, शिक्षण संस्था व पतसंस्था या व अशा समविचारी संस्था संघटनांसोबत कार्यरत होते. तसेच विविध सामाजिक आंदोलनांतही त्यांचा सक्रिय सहभाग असे. ९२-९३ च्या दंगलीच्या काळात मालाड-मालवणीसारख्या विभागात सामाजिक सलोखा राखण्याकरिता ते कार्यरत होते. पर्यटन व ट्रेकिंग याची विशेष आवड असल्याने यूथ होस्टेल या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा राष्ट्रीय कार्यक्रमांतून मुंबई व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि कॅम्प लीडरशिपही केलेली आहे. त्यांना ‘अनुराग समाजरत्न’ या राज्यस्तरीय पुरस्काराने आणि मुंबई महापालिका क्रीडा भवनकडून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84322 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top