सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार

sakal_logo
By

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई इंटक संलग्न महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापालिका मुख्यालयातील वाहन विभागात झालेल्या कार्यक्रमात भानुदास दोडके, शिवाजी दातीर, बाळू घावट, अनिल चव्हाण, माणिक राऊत, महेंद्र कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कर्मचारी सेवानिवृत्त होतील, त्याच दिवशी त्या कर्मचाऱ्याच्या हिशेबाचा धनादेश पालिका प्रशासनाने द्यावा, जेणेकरून आपल्या हक्काच्या रकमेसाठी कर्मचाऱ्याला प्रशासन दरबारी हेलपाटे मारण्याची वेळ ये नये. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून पालिका प्रशासनाला लवकरच हा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे रवींद्र सावंत यांनी सांगितले. यावेळी वाहन चालक युनिटचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, कृष्णा घनवट, फायर युनिटचे अध्यक्ष कोकाटे, कुणाल खैरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84326 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top