आठवड्याच्या लढ्यानंतर परिचारिकांचा संप स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठवड्याच्या लढ्यानंतर परिचारिकांचा संप स्थगित
आठवड्याच्या लढ्यानंतर परिचारिकांचा संप स्थगित

आठवड्याच्या लढ्यानंतर परिचारिकांचा संप स्थगित

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : राज्यभरातील सरकारी वैद्यकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून पुकारलेला संप तूर्तास मागे घेण्यात आला आहे. परिचारिकांच्या मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सुमित्रा तोटे यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी झालेल्या बैठकीत १५ जुलैपर्यंत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले आहे. २ जूनपासून पुन्हा परिचारिका कर्तव्यावर रुजू होणार आहेत.

२८ मेपासून मुंबईतील आझाद मैदानात परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. अखेर आज त्यांनी संप मागे घेतला. परिचारिकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. मागण्यांसंदर्भात १५ जुलैपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. त्याबाबत समन्वय साधण्यासाठी अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. अशा आशयाचे पत्र मिळाल्यानंतर परिचारिकांचे बेमुदत आंदोलन मागे घेण्याबाबतचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले; मात्र आश्वासन मान्य न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

रुग्णांना दिलासा
परिचारिकांनी २८ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. मुंबईतील जे. जे. रुग्णालयामधील दिवसाच्या किमान २० ते २५ मोठ्या आणि कठीण शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परिणामी, प्रतीक्षा यादीही वाढली होती; पण आता परिचारिकांनी त्यांचा संप मागे घेतल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84357 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top