मालाडमधील रस्ते आणि नाल्याची कामे अर्धवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडमधील रस्ते आणि नाल्याची कामे अर्धवट
मालाडमधील रस्ते आणि नाल्याची कामे अर्धवट

मालाडमधील रस्ते आणि नाल्याची कामे अर्धवट

sakal_logo
By

मालाड, ता. १ (बातमीदार) ः पावसाळा तोंडावर आहे आहे, पण मालाड पश्चिम परिसरातील रस्ते आणि नाल्यांची कामे अजूनही पूर्ण करण्यात आली नाहीत. येथील नाहर रोड परिसरातील रस्त्यावर नाल्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच याच रस्त्यावरील देव आशिष इमारतीच्या आवारातून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम व काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. नाल्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नाल्यातील पाणी देव आशिष इमारतीच्या आवारात शिरण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे भुजाले तलावालगतच्या रस्त्यावर नाला रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने बंद केले आहे. त्यासाठी खणलेला खड्डा बुजवून ठेवला आहे. येथील रस्त्याचे डांबरीकरण अद्याप झाले नसल्याने येथून लिंक रोडवर तसेच भंडारवाडा येथे येण्याजाण्यास अडचण निर्माण होणार आहे. सोमवार बाजार बामनदेव ते हनुमान मंदिर व सोमवार बाजारमधील अधिकतर रस्त्यांवर अदाणी वीज कंपनीच्या वतीने केलेल्या खोदकामानंतर रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. तसेच पन्नालाल घोष मार्ग या रस्त्यावरही खोदकाम आणि नाल्याची कामे अर्धवट आहेत. जर पाऊस सुरू झाला तर नागरिकांना चिखलातून वाट काढत घर गाठावे लागणार आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे, पण यावर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे चिकणे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---
आपण सांगितलेल्या रस्त्यांची व कामांची माहिती घेतो. त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.
- मंदार चौधरी, सहायक अभियंता, रस्ते खाते पी उत्तर विभाग.
---
नाल्याची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. तसेच देव आशिष इमारत परिसरात पावसाचे पाणी साचते, त्यासाठी नाल्याच्या जोडणीचे काम सुरू आहे.
- सतीश माने, सहायक अभियंता, एस डब्ल्यू एम

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84364 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top