केंद्रीय कृषि सचिव तृप्ता जोशी बोर्डीला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय कृषि सचिव तृप्ता जोशी बोर्डीला भेट
केंद्रीय कृषि सचिव तृप्ता जोशी बोर्डीला भेट

केंद्रीय कृषि सचिव तृप्ता जोशी बोर्डीला भेट

sakal_logo
By

बोर्डी, ता. १ (बातमीदार) ः केंद्रीय कृषी सचिव तृप्ता जोशी यांनी बुधवार बोर्डी तसेच डहाणू तालुक्यातील कृषी क्षेत्राला भेट दिली. या वेळी त्यांनी आवर्जून लतिका पाटील यांच्या फळ प्रक्रिया केंद्र तसेच कृषिभूषण शेतकरी, महाराष्ट्र राज्याचे कृषी सल्लागार समितीचे सदस्य यज्ञेश सावे यांच्या फळ खरेदी-विक्री केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या वेळी कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्रियाविषयक शास्त्रज्ञ रूपाली देशमुख, अशोक भोईर, प्रशांत वरठा उपस्थित होते. फळ प्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत लाभदायक असून पंतप्रधान सूक्ष्म फळ प्रक्रिया या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आव्हान या वेळी जोशी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84383 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top