सिडको वसाहतींना अधिक पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिडको वसाहतींना अधिक पाणी मिळणार
सिडको वसाहतींना अधिक पाणी मिळणार

सिडको वसाहतींना अधिक पाणी मिळणार

sakal_logo
By

खारघर, ता. २ (बातमीदार) : हेटवणे धरणातून अधिक दाबाने पाणी खेचण्यासाठी लागणारी परवानगी सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशनकडून मिळाली आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून सिडको वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खारघर, तळोजा, नवीन पनवेल आदी सिडकोच्या वसाहतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही दिवसांपूर्वी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी सर्व वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोला रोज २८९ एमएलडी पाण्याची गरज आहे. सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशनकडून परवानगी मिळाल्यानंतर ३१ मेनंतर कामाला सुरुवात होईल, असे सांगितले होते. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता, नाशिक येथील सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन (एसडीओ) कार्यालयाकडून सात दिवसांपूर्वी परवानगी मिळाली असून सिडकोकडून हेटवणे धरणातून अधिक दाबाने पाणी खेचण्यासाठी लागणाऱ्या वाहिन्या बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच मागील वर्षी सिडको वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिडकोने पेण येथील हमरापूर डोंगर फोडून मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले होते. हेटवणे धरणाच्या मुख्य गेटवर मोठी वाहिनी पाणी खेचण्यासाठी बसवण्याचे काम येत्या तीन व चार जून रोजी करण्यात येणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्यामुळे सिडकोने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून सिडको वसाहतीत हळूहळू पाणीपुरवठ्यात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84426 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top