पाच लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प
पाच लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प

पाच लाख वृक्षारोपणाचा संकल्‍प

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘क्‍वेस्‍ट ग्‍लोबल’तर्फे जागतिक वनीकरण मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. या संस्थेने २०२५ पर्यंत पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. ५ जूनला पर्यावरणी दिनी या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. २०२५ पर्यंत या प्रकल्‍पाचे तीन टप्‍पे असतील आणि पहिला टप्‍पा ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सुरू होऊन २०२३ मध्‍ये वसुंधरा दिनी समाप्‍त होईल. भावी पिढ्यांसाठी भूमातेला राहण्‍यायोग्‍य बनवण्‍यासाठी आपल्‍या जंगलाचे संवर्धन व विस्‍तार करणे महत्त्वाचे आहे. क्‍वेस्‍ट ग्‍लोबल प्‍लेज हा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत टिकून राहणारे पर्यावरणीय अस्तित्‍व निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचे क्‍वेस्ट ग्‍लोबलचे अध्‍यक्ष अजित प्रभू यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84438 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top