बुद्धविहार व अभ्यासिकेचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धविहार व अभ्यासिकेचे उदघाटन
बुद्धविहार व अभ्यासिकेचे उदघाटन

बुद्धविहार व अभ्यासिकेचे उदघाटन

sakal_logo
By

कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील इराणी वाडी, हेमुकालांनी मार्ग -४ येथे प्रज्ञा शील करुणा बुद्धिविहार आणि अभ्यासिकेचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार विजय गिरकर, मंडळ अध्यक्ष दीपक तावडे, मनपा गटनेते कमलेश यादव, माजी प्रभाग समिती अध्यक्षा लीना देहेरकर, जगदीश झाल्टे, हरिहर यादव, नारायण लव्हाळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपण बुद्धाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. शांती, समतेचा विचार समाजात रुजविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मंत्री रामदास आठवले यांनी केले; तर बुद्ध विहाराच्यावरती अभ्यासिका बांधल्याने त्याचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना होईल, असे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले. दरम्यान, माजी नगरसेविका लीना देहेरकर यांनी बुद्ध विहार आणि अभ्यासिका यासाठी आमदाराकडे पाठपुरावा केला होता. चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार योगेश सागर यांच्या विकास निधीतून इराणी वाडी येथे प्रज्ञा शील करुणा बुद्ध विहार आणि त्यावर अभ्यासिका बांधण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता.१) या बुद्धविहाराचे उद्घाटन केले. या वेळी बुद्धपूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरची गीते सादर करण्यात आली. त्याला उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबा बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84456 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top