गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर) : पनवेल परिसरासह इतर ठिकाणी मध्यरात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कळंबोली स्टील मार्केट परिसरात सात जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल कला आहे.

पनवेल शहर परिसरासह कळंबोली पोलिस ठाण्याचे गस्ती पथक स्टील मार्केट परिसरात गस्त घालत असताना रात्री १ ते २ दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी सुरू केली. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. अंधारात लपण्याचे व पळून जाण्याचे योग्य उत्तर न देता आल्यामुळे त्यांच्यावर मुंबई पोलिस कायदा कलम १२२ क अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे रात्री अनावश्यक शहरात फिरणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे पाहायला मिळत आहे.
---
भाड्याच्या गाडीची परस्पर विक्री
नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर) : महिन्याच्या भाड्यासाठी दिलेली गाडी परत न करता आरोपींनी ती विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी गाडीसह एका व्यक्तीस ताब्यात घेतले. अखिलेश खापर्डे (३३, रा. पनवेल) यांनी गाडी क्रमांक एमएच ४६ बीके ०६५३ ही महिन्याच्या भाड्याने चालवण्यासाठी दोघा जणांना दिली होती, परंतु सदर व्यक्तींनी ती गाडी घेऊन विक्री केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव हुलगे, पोलिस नाईक अशोक राठोड व त्यांच्या पथकाने एकाला गाडीसह ताब्यात घेतले.
----
पान टपरीवर गुटखा, तंबाखू हस्तगत

नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर) : पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने करंजाडे येथे टाकलेल्या छाप्यात एका पान टपरी चालकाकडून ९० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू हस्तगत केला.

करंजाडे आर ५ या ठिकाणी गोविंद राजभर (वय २४) हा त्याच्या पानटपरीवर बेकायदा गुटखा व सुगंधित तंबाखू ठेवत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेट्टे, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग राजपूत, पोलिस नाईक रवींद्र पारधी व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून ९० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुंगधित तंबाखू हस्तगत केला. याप्रकरणी सदर व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात आली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बजरंग राजपूत करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84480 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top