मुंबईकरांना ‘अलर्ट’ देणार महानगरपालिकेचे ॲप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांना ‘अलर्ट’ देणार महानगरपालिकेचे ॲप
मुंबईकरांना ‘अलर्ट’ देणार महानगरपालिकेचे ॲप

मुंबईकरांना ‘अलर्ट’ देणार महानगरपालिकेचे ॲप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईकरांना अतिवृष्टीचा, भरती-ओहोटीचा तसेच वादळी परिस्थितीचा आणि पाणी साचलेल्या ठिकाणाचा ॲलर्ट देणारे मोबाईल ॲप हे येत्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग येत्या १० ते १२ दिवसांमध्ये (Disaster Management BMC) ॲप्लिकेशन लाँच करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपला रोजचा प्रवास सुरू करण्यापूर्वीच ॲलर्ट मिळणार आहे. साधारणपणे मान्सूनच्या निमित्ताने मिळणारा ॲलर्ट हा सरासरी तीन तास आधीच उपलब्ध होईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
येत्‍या दहा१० ते १२ दिवसांमध्ये हे ॲप डाऊनलोड करणे शक्य होणार आहे. मुंबईतील विविध यंत्रणा पालिकेच्या आपत्कालीन विभागाशी कनेक्टेड आहेत. त्यामध्ये भारतीय हवामान विभाग तसेच आपत्कालीन विभागाला माहिती देणाऱ्या विविध यंत्रणा ॲलर्ट देण्याचे काम करणार आहेत. मुंबईत यंदा २२ दिवस भरतीचे दिवस आहेत. या दिवसांच्या निमित्ताने मुंबईकरांना आगाऊ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.

ऑटो डायलर सुविधा
मुंबईतील पोलिस ठाणे तसेच अग्निशमन दलाच्या जवळच्या पोलिस ठाण्याला ऑटो डायलरची सुविधा या ॲपच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

तक्रारीही करता येणार
ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या भागातील माहिती किंवा तक्रारी करण्यासाठीची सुविधाही येत्या दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी काही प्रयोग करण्यात येत आहेत. त्यानुसार येत्या कालावधीत नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठीही हे ॲप उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.

हे नोटिफिकेशन मिळणार
पाणी साचलेली मुंबईतील ठिकाणे
भरती-ओहोटीच्या दिवसाचा ॲलर्ट
तीव्र वादळाची माहिती
पावसाची परिस्थिती

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84501 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top