येऊर येथील ७० बेकायदा नळजोडण्या तोडल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येऊर येथील ७० बेकायदा नळजोडण्या तोडल्या
येऊर येथील ७० बेकायदा नळजोडण्या तोडल्या

येऊर येथील ७० बेकायदा नळजोडण्या तोडल्या

sakal_logo
By

येऊर येथील ७० बेकायदा नळजोडण्या पालिकेने तोडल्या
- ठाणे पालिका प्रशासनाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : येऊर भागात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बांधकामामुळे व हॉटेल व्यावसायिकांच्या बेकायदेशीर नळजोडण्यांमुळे स्थानिकांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. त्याविरोधात स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत, केलेल्या कारवाईतून बेकायदा नळजोडणी घेऊन पाणी चोरून वापरले जात असल्याची बाब महापालिकेच्या कारवाईतून उघड झाली असून अशा बेकायदा नळजोडणीविरोधात महापालिका प्रशासनाने कारवाई करीत ७० नळजोडण्या तोडून टाकण्यात आल्या आहेत.

ठाण्यातील येऊर हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असा परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधतेसह वन्यप्राण्यांचाही वावर असल्याचे दिसून येत आहे. या भागात गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे करून बंगले आणि हाॅटेलची उभारणी करण्यात आली आहे. त्याकडे महापालिका, वन विभाग आणि महसूल यांच्याकडून दुर्लक्ष करीत असल्याची ओरड स्थानिकांकडून होत आहे. याठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांच्या गावासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही बंगले आणि हाॅटेल व्यावसायिकांनी डल्ला मारल्याने स्थानिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात स्थानिकांकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत होत्या. तसेच पालिकेच्या जलवाहिनीतून बेकायदा नळजोडणी घेऊन बंगले आणि हाॅटेलमध्ये चोरून पाणी वापरले जात असल्याचा आरोपही स्थानिकांनकडून करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने येऊरमध्ये जाऊन अशा बेकायदा नळजोडण्यांचा शोध सुरू केला असून आतापर्यंत ७० बेकायदा नळजोडण्या पालिकेने तोडल्या असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84534 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top