वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा
वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा

वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा

sakal_logo
By

कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः कांदिवलीतील चारकोप सेक्टर ८ येथील श्री दत्त मंदिर मार्गावर दुतर्फा असलेले पदपथ फेरीवालामुक्‍त झाले आहेत. महापालितर्फे येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर तोडक कारवाई करून सामान जप्त करण्यात आले आहे. आर/मध्य विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी नीलेश कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी जवळपास ३५-४० अनधिकृत फेरीवाल्यांच्या टपऱ्या, बांधलेले लोखंडी ढाचे आणि लाकडी बाकडे तोडण्यात आले.
आर/मध्य विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी नीलेश कवडे यांनी शुक्रवारी सकाळी या ठिकाणी कारवाई सुरू केली. तीन मालवाहक गाड्यांसह मनपाच्या १२ कर्मचाऱ्यांनी सर्वच दुकानांवर कारवाई केली. शुक्रवार असल्याने चिकनच्या दुकानावर गर्दी होती. अचानक झालेल्या कारवाईत कोंबड्या काढून टेबल, बाकडे व सामान जप्त करण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले. दोन तासांत संपूर्ण पदपथ रिकामा झाला. श्री दत्त मंदिर मार्गाने मोकळा श्वास घेतल्‍यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84542 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top