
निर्देशांकांमध्ये अल्प घसरण
मुंबई, ता. ३ : अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरीचे धोरण स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार निर्देशांक आज दिवसभराच्या उच्चांकावरून खाली आले. आज सेन्सेक्स ४८.८८ अंश, तर निफ्टी ४३.७० अंश घसरला.
अमेरिकी रोजगाराची आकडेवारी अपेक्षित असल्याने जागतिक शेअरबाजारही संमिश्र कल दाखवीत होते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याने शेअरबाजारात शेवटच्या तासाभरात विक्री झाली. सेन्सेक्स ५५,७६९.२३ अंशांवर, तर निफ्टी १६,५८४.३० अंशांवर स्थिरावला.
आज अल्ट्राटेक सिमेंट साडेपाच टक्के; तर मारुती, एनटीपीसी, अॅक्सीस बँक, बजाज फीनसर्व्ह, इंडसइंड बँक हे शेअर दोन ते तीन टक्के घसरले. महिंद्र, एअरटेल, टाटा स्टील, स्टेट बँक, नेस्ले हे शेअरदेखील सुमारे एक टक्का घसरले; पण आज दोन टक्के म्हणजे ५५ रुपयांनी वाढून २,७७९ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने सेन्सेक्सची फार पडझड होऊ दिली नाही. इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, सनफार्मा, विप्रो व टीसीएस यांचेही भाव वाढले.
..................................
आजचे सोन्या-चांदीचे भाव
सोने - ५२,४७० रु.
चांदी - ६२,७०० रु.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84545 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..