लाखो रुपयांचा अपहार करणारा राणे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाखो रुपयांचा अपहार करणारा राणे अटकेत
लाखो रुपयांचा अपहार करणारा राणे अटकेत

लाखो रुपयांचा अपहार करणारा राणे अटकेत

sakal_logo
By

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : अंधेरी येथील ऑनसाईट इलेक्ट्रो सर्व्हिसेस प्रा.लि. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सेवा पुरवणाऱ्या कंपनीत लाखो रुपयांचा अपहार करून फरारी झालेल्या नागेश भिकाजी राणे (वय ३६) या आरोपीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पकडून सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या महिन्याभरापासून सहार पोलिस या आरोपीचा शोध घेत होते. हा आरोपी नवी मुंबईत तळोजा येथे लपून बसला होता.

नागेश भिकाजी राणे हा वसई भागात राहण्यास असून तो अंधेरी येथील ऑनसाईट इलेक्ट्रो सर्व्हिसेस प्रा.लि.या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सेवा पुरवणाऱ्या कंपनीत सर्व्हिस कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होता. काही महिन्यांपूर्वी नागेश राणे याने अभिषेक कुमार सिंग याच्यासोबत कंपनीच्या अकाऊंटमधील लाखो रुपयांचा अपहार केला होता. त्यामुळे सहार पोलिसांनी २२ एप्रिल रोजी नागेश आणि अभिषेक या दोघांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे फरारी झाला होता. नागेश राणे हा दिवसभरात काही मिनिटेच मोबाईल वापरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्याबाबत नवी मुंबई पोलिसांना सूचना केली होती.

आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहपोलिस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी गुन्हे शाखा युनिट-२ ला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा राणे हा तळोजा येथील दीपक फर्टिलायझर कंपनी परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी नागेश राणे याला ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84553 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top