तिघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिघांचा मृत्यू
तिघांचा मृत्यू

तिघांचा मृत्यू

sakal_logo
By

दिवसभरात ११३४ नवीन रुग्णांची नोंद
तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : कोविड रुग्णांच्या बाबतीत राज्याची चिंता वाढली असून शुक्रवारी दिवसभरात ११३४ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता राज्यातील कोविड रुग्णांची संख्या ७८,९०,३४६ एवढ्यावर पोहोचली आहे; तर शुक्रवारी राज्यभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या ५६३ रुग्णांना आज डिस्चार्ज दिला गेला. आतापर्यंत एकूण ७७,३७,३५५ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत; तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०६ टक्क्यांवर कायम आहे.

सक्रिय रुग्ण पाच हजारांवर

राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार १२७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या आगमनापासून ८ कोटी १० लाख ४ हजार १९३ नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यापैकी केवळ ७८ लाख ९० हजार ३४६ रुग्णांमध्ये कोरोना विषाणू आढळला. राज्यात कोरोनाचे पॉझिटीव्हीटीचे प्रमाण केवळ ९.७४ टक्केच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात शुक्रवारी एकूण तीन कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुणे मंडळात २ आणि लातूरमध्ये १ अशा मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या १,४७,८६४ एवढ्यावर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७ टक्के एवढा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84558 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top