
आयएनएस निशंक आणि अक्षय सेवानिवृत्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः गेल्या ३२ वर्षांत देशाच्या सागरी सुरक्षितेत महत्त्वाची सेवा देणाऱ्या ‘आयएनएस निशंक’ आणि ‘आयएनएस अक्षय’ या युद्धनौका शुक्रवारी सूर्यास्ताच्या वेळी सेवानिवृत्त झाल्या. अतिशय आव्हानात्मक कारवायांमध्ये या युद्धनौकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
जॉर्जियातील युएसएसआर शिपयार्डमध्ये या युद्धनौकांची बांधणी झाली होती. रूसमध्ये बांधण्यात आलेली आयएनएस निशंक युद्धनौका ही वीर श्रेणीतील चौथी युद्धनौका आहे. १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात शौर्य दाखवणारी ही युद्धनौका आहे. अचूक असा मिसाईलचा मारा करणारी तसेच शत्रूला धडकी भरवणारी किलर युद्धनौका म्हणून या युद्धनौकेने गौरव मिळवला होता. नौदलाचे सामर्थ्य म्हणूनही या युद्धनौकेकडे पाहिले जाते. ‘आयएनएस अक्षय’ ही २३ व्या गस्त घालणाऱ्या युद्धनौकेपैकी एक नौका आहे. तटीय गस्त घालणे, तसेच पाणबुडीच्या युद्धात या युद्धनौकेची कामगिरी महत्त्वाची होती. शत्रूच्या पाणबुड्या रॉकेटच्या माध्यमातून उडवून लावण्याचे सामर्थ्य या युद्धनौकेत होते. सुरक्षेसाठी तसेच बचावात्मक परिस्थितीत या दोन्ही युद्धनौकांची महत्त्वाची कामगिरी आहे. भारत-पाकिस्तान १९९९ च्या कारगिल युद्धात ऑपरेशन तलवार, २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन पराक्रम, २०१७ उरी पठाणकोट हल्ल्यानंतरही या युद्धनौकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84567 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..