खोनी गावात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोनी गावात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
खोनी गावात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

खोनी गावात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By

भिवंडी, ता. ४ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील खोनी गाव परिसरात राहणाऱ्या एका वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना २ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्ध महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिन्यांची लूट केली होती. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ माजली होती. दरोडा टाकणाऱ्या तीन जणांना दोन महिन्यांनंतर अटक करण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. उमेश दशरथ घाटाळ, आकाश कैलास घाटाळ, राहुल खानखोडे अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
मार्च महिन्यात खोनी गाव परिसरात राहणाऱ्या ॲड. अजय विष्णू पाटील यांच्या घरी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला; मात्र कार्यालयात काही न सापडल्याने दरोडेखोर बंगल्यातील पहिल्या माळ्यावरील दरवाजाच्या आतील कडी उचकटून अजय यांची आई नंदा यांच्या खोलीत शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली; तर गळ्यातील गंठण व हातातील बांगड्या असे नऊ तोळे सोन्याचे दागिने हत्याराचा धाक दाखवून नेले होते. याबाबत निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक नरेश पवार व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल फोनच्या तांत्रिक आधारे दरोडेखोरांना अटक केली.
- सुनील वडके, सहायक पोलिस आयुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84605 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top