
रानभाज्या बाजारात दाखल!
तळा, ता. ४ (बातमीदार) : तळा शहरातील बाजारपेठेत रानभाज्या दाखल झाल्या असून, या भाज्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग वाढली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात रानात वेगवेगळ्या भाज्या उगवतात. यामध्ये शेवळा, दिंडा, कुड्याच्या शेंगा, आखुड, ससेकान अशा विविध भाज्या रानभागात येतात. या भाज्या वर्षातून एकदा मिळत असल्याने त्यासाठी खाणारी माणसे मोठ्या आवडीने त्या खरेदी करतात. या रानभाज्या बारीक चिरून, चिरलेला कांदा, हळद, मीठ, तिखट, तेलाची फोडणी करून देऊन छान बनवतात. भाकरीबरोबर या भाज्या खूप छान, चवदार लागतात. नाचणीची भाकरी, तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते.
----
कोट
भाज्या रानावनात उन्हातान्हातून फिरून आणाव्या लागतात. आता महागाईच्या काळात त्यासुद्धा महाग झाल्या आहेत. शेवळाची भाजी आता २० रुपये झाली आहे. या भाज्या आजही मोठ्या आवडीने गृहिणी खरेदी करतात.
रोहिनी मुकण, भाजी विक्रेते
वर्षातून एकदा मिळणारी भाजी ती पोटात गेली पाहिजे. या कडवट भाज्या पोटासाठी चांगल्याच असतात. भाजी चवदार लागते. ती पुन्हापुन्हा खावीशी वाटते.
निर्मला आईनकर, गृहिणी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84613 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..