मत्स्यप्रक्रिया विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्यप्रक्रिया विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
मत्स्यप्रक्रिया विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

मत्स्यप्रक्रिया विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

sakal_logo
By

रोहा, ता. ५ (बातमीदार) : काढणीपश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था किल्ला, ता. रोहा येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत मत्स्यप्रक्रिया या विषयावर लाभार्थींचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये महिला उद्योजक तयार व्हावेत, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येईल, असे आवाहन आत्मा या संस्‍थेचे रायगड उपसंचालक सतीश बोराडे यांनी केले.
संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. पतंगे यांनी उद्योजकतावाढीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत सदर प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त महिलांनी व महिला बचत गटांनी लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, या दृष्टीने प्रयत्न करावा, असे सांगितले; तर खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल येथील डॉ. विवेक वर्तक संशोधन अधिकारी (मत्स्य) यांनी लाभार्थ्यांना मत्स्यसंवर्धन व प्रक्रिया या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाचा एकूण ३० लाभार्थ्यांनी लाभ घेतला; तर प्रशिक्षणाचे आयोजन व यशस्वितेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84623 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top