
पाताळगंगा नदीचे प्रदुषण आटोक्यात
रसायनी, ता. ४ (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार सांडपाण्यावर कारखान्यातच ईटीपीत आणि त्यानंतर सीईटीपी केंद्रात प्रक्रिया करत आहे. तसेच क्षेत्राबाहेरील कारखानदार प्रदूषित सांडपाण्यावर कारखान्यातच ईटीपीत आधुनिक पद्धतीने चांगली प्रक्रिया करत असल्याने पाताळगंगा नदीच्या जल प्रदूषणाला आळा बसला असून, प्रदूषण आटोक्यात आले आहे.
रसायनी-पाताळगंगा परिसरातील ओढ्यात, नाल्यात अधूनमधून प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने ते सांडपाणी नदीला जाऊन मिळत आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. याशिवाय परिसरात शहरीकरण होऊ लागले, वाढत्या लोकसंख्येमुळे पाताळगंगा नदीत नागरी वस्तीतील सांडपाणी सोडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, नदीतील जलचर प्राण्यांना धोका होऊ शकतो, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे; तर प्रदूषित सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांमुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. चोरून प्रदूषित सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांना आळा घातला पाहिजे, तसेच नागरी वसाहतीतील सांडपाण्यावर प्रकिया केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
१५ कंपनीतील सांडपाण्यावर प्रकिया
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सीईटीपी केंद्रात आधुनिक पद्धतीने रसायन निर्मितीच्या सुरू असलेल्या १५ कंपन्यांतील सांडपाण्यावर प्रकिया केली जात आहे, असे एमआयडीसीच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे.
---
कोट :
औद्योगिक क्षेत्रातील नाल्यातून परिसरातील नैसर्गिक सांडपाणी नदीला जाऊन मिळत आहे. या नाल्यात कारखान्यातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहातील सांडपाणी सोडण्यास बंदी घातली पाहिजे. या पाण्याबरोबर प्रदूषित सांडपाणी सोडत असल्याची शक्यता आहे. कारखान्यातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे असे वाटते.
धर्मराज जाधव, सेक्रेटरी, अतिरिक्त पाताळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84628 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..