ग्लोबल रुग्णालयाकडून टॅक्सी चालकांना सीलबंद पाणी बाटल्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लोबल रुग्णालयाकडून टॅक्सी चालकांना सीलबंद पाणी बाटल्यांचे वाटप
ग्लोबल रुग्णालयाकडून टॅक्सी चालकांना सीलबंद पाणी बाटल्यांचे वाटप

ग्लोबल रुग्णालयाकडून टॅक्सी चालकांना सीलबंद पाणी बाटल्यांचे वाटप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : वाढत्या उकाड्यात पोटापाण्यासाठी दिवसरात्र मुंबईच्या रस्त्यावर प्रवाशांना सेवा देणाऱ्या टॅक्सीचालकांना ग्लोबल रुग्णालयाकडून सीलबंद पाण्याची बाटली देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. रुग्णालयात रुग्णांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीचालकांना कर्मचाऱ्यांकडून विचारपूस करून पाणी दिले जाते. ग्लोबल रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे टॅक्सीचालकवर्गात रुग्णालयाचे कौतुक होत आहे.
मुंबईतील टॅक्सी वाहतूक ही शहरातील महत्त्वपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणारी टॅक्सी सेवा एकमात्र सेवा आहे. अनेक बेरोजगार तरुण रात्रंदिवस ही सेवा चालू ठेवतात. तसेच, कोविड लाट असो किंवा उष्णतेची लाट हे न पाहता ते फक्त प्रवाशांसाठी काम करतात. बऱ्याचदा प्रवाशांमध्ये रुग्ण, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश असतो. अशा गंभीर रुग्णाला वेळेवर सुरक्षितपणे रुग्णालयात नेण्यास ते मदत करतात. म्हणून ते देवदूतांपेक्षा कमी नाहीत.
मुंबईतील हे पडद्यामागचे हिरो प्रत्येकाला त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास मदत करतात. त्यांच्या या दिवस-रात्र सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्लोबल रुग्णालयातर्फे मोफत पाणी बॉटलचे वाटप सुरू केले आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी छोट्या प्रमाणात का होईना प्रयत्न केले जाऊ शकतात. या वेळी ग्लोबल हॉस्पिटल, परळ, मुंबई यांनी टॅक्सीचालकांना मदत करण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्या देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84638 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top