राजसाहेबांच्या आदेशांचे पालन करणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजसाहेबांच्या आदेशांचे पालन करणार!
राजसाहेबांच्या आदेशांचे पालन करणार!

राजसाहेबांच्या आदेशांचे पालन करणार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून सात उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचाही भाव चांगलाच वाढला आहे. यात आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचेही मत मोलाचे ठरणार आहे. याबाबत मनसेच्या आमदार राजू पाटील यांनी राजसाहेब जो आदेश देतील, त्याचे पालन होईल, असे सांगत सध्या अधिकचे बोलणे टाळले.

मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप- मनसे नेत्यांमध्ये जवळिक वाढल्याचे आपण पाहिले आहे; तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू पाटील यांचेसुद्धा संबंध चांगले आहेत. मात्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, पालिका निवडणूक जवळ आली असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपसाठी मनसेचे एक मत मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नसली, तरी भाजपला त्या मताची आशा आहे. दरम्यान याबाबत राजू पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी राजसाहेब जो आदेश देतील, त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. यामुळे आता राज यांच्या आदेशानुसारच सूत्रे हलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84653 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top