
काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू
मुंबई, ता. ४ ः काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे, ते सर्व सहाय्य करील, अशी नि:संदिग्ध ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखवली गेली; पण त्यांना मारले जात आहे. अशा भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक आणि तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकेच वचन देऊ शकतो की या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील.
उद्धव ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्यभावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84654 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..