वाईन शॉपसमोर मद्यपींचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाईन शॉपसमोर मद्यपींचा वावर
वाईन शॉपसमोर मद्यपींचा वावर

वाईन शॉपसमोर मद्यपींचा वावर

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. ५ (बातमीदार) : सेक्टर दोनमधील पंचवटी स्वीटजवळील कामगार नाक्यावर वाईन शॉपसमोर सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत उघड्यावर मोठ्या प्रमाणात तळीराम दारूचे सेवन करत असतात. यामुळे पदपथावरून जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. तसेच या दारू पिणाऱ्यांमुळे महिला छेडछाडीच्या प्रकाराला सामोऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी या दुकानावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

स्थानिक पोलिस ठाण्याला याअगोदर तक्रार देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही याप्रकरणी पोलिसांना निवेदन दिले आहे. पोलिसांची कारवाई झाली की काही दिवसांनंतर पुन्हा तेच प्रकार घडत असतात. बाजूलाच वाईनचे दुकान असल्यामुळे दारू पिणारे लोक तेथेच बसून आपला डाव मांडतात. यावर कायमस्वरूपी काही तरी तोडगा निघावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांनी केली आहे. वाईन शॉपवाल्यांनी मद्यपींना दुकानाबाहेर बसण्यास मज्जाव करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंद्रकांत डांगे यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84678 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top