रंगमंचाचा अनुभव महत्त्वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगमंचाचा अनुभव महत्त्वाचा
रंगमंचाचा अनुभव महत्त्वाचा

रंगमंचाचा अनुभव महत्त्वाचा

sakal_logo
By

वाशी, ता. ५ (बातमीदार) : रंगमंचाचा अनुभव येताच लगेच मालिका, चित्रपटांसाठी ऑडिशन देऊ नका. काही वर्षे रंगभूमीवर घट्ट पाय रोवल्यानंतरच इतर माध्यमांकडे वळावे. रंगमंचाचा अनुभव या क्षेत्रात महत्त्वाचा आहे. तसेच या क्षेत्रात कितीही मोठे झालात, तरी पाय मात्र जमिनीवरच ठेवावेत, असा मौलिक सल्ला अभिनेत्री सविता मालपेकर यांनी दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ऐरोली शाखेच्या वतीने मुलांसाठी १५ दिवसांच्या बाल नाट्य शिबिराचा ऐरोलीत नुकताच समारोप करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. समोरापाच्या प्रसंगी शिबिरातील मुलांचे ‘शूटिंग शूटिंग’ नाटक सादर करण्यात आले. समारोप प्रसंगाच्या वेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष विजय चौगुले, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते रमेश वाणी, नाट्य अभिनेते अशोक पालवे, नाट्य परिषदेचे सचिव अभिनेते संदीप जंगम, नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अभिनेते रवींद्र औटी, बाल नाट्य प्रशिक्षक श्रीहरी पोवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84679 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top