वाढत्या महागाईविरोधात तळा राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या महागाईविरोधात तळा राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन.
वाढत्या महागाईविरोधात तळा राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन.

वाढत्या महागाईविरोधात तळा राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन.

sakal_logo
By

तळा, ता. ५ (बातमीदार) : केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणामुळे राज्यात व देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले असून सीएनजीचे दरही वाढले आहेत. इंधनच महाग झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भावदेखील कडाडले आहेत. गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला भगिनींना घरखर्च चालविणे अवघड झाले आहे. म्हणूनच रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंढे यांच्या नेतृत्वाखाली तळा तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने तळा तहसीलदार यांना महागाईविरोधात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तळा तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, तळा शहर अध्यक्षा मेघा सुतार, आयेशा पलवकर शेनवली सरपंच, निकिता गायकवाड शहर युवती अध्यक्ष दिव्या वडके, नगरसेविका सारिका, रंजना पिसाळ आदी महिला उपस्थित होत्या.
Attachments area

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84697 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top