
डायमंड शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी जुबेर मापकर
रोहा, ता. ५ (बातमीदार) : जामे मस्जिद ट्रस्ट अष्टमी (ता. रोहा) अध्यक्ष म. शफी पानसरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत पुढील ३ वर्षांकरिता डायमंड एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. निवडणूक अधिकारी अफसर करजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कार्यकारिणी मंडळाच्या विशेष सभेत उच्च शिक्षित जुबेर मापकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जुबेर मापकर, उपाध्यक्ष इरफान दर्जी, सचिव अल्ताफ चोरडेकर, सहसचिव अफवान मिटकर, खजिनदार समीर दर्जी, तर सदस्य म्हणून म. शफी पनसारी, बाकर साष्टीकर, खालिद बेबन, अ.मजिद पठाण, नजीर खान, समद बंदरी यांची निवड करण्यात आली; तर स्वीकृत सदस्य म्हणून इम्तियाज दर्जी व यासीन पानसरे यांनी निवड करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84698 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..