झाडांवर फलक लावल्यास कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडांवर फलक लावल्यास कारवाई
झाडांवर फलक लावल्यास कारवाई

झाडांवर फलक लावल्यास कारवाई

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) ः भिवंडी पालिकेच्या वतीने शहर परिसरातील प्रत्येक झाडाची तपासणी करण्यात येणार आहे. झाडाला मारलेले खिळे, त्यावर लावण्यात आलेले बॅनर्स, पोस्टर्स, नामफलक इत्यादी काढून घेण्यात येणार आहेत. पर्यावरणातील सर्वच घटकांची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. यापुढे झाडाला खिळे मारणे, पोस्टर्स, बॅनर्स, बोर्ड लावणे अथवा अन्य मार्गाने झाडाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पालिका आयुक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिला आहे.
भिवंडी पालिकेच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शहराबाहेर वेशीवर असलेल्या पोगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. पालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शिवसेनेचे स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांच्या हस्ते भारतीय प्रजातीची झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, पर्यावरण विभागप्रमुख नीतेश चौधरी, उद्यान विभागप्रमुख नीलेश संखे यांच्यासह कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84724 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top