पर्यावरण संवर्धनाचा जागर घुमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण संवर्धनाचा जागर घुमला
पर्यावरण संवर्धनाचा जागर घुमला

पर्यावरण संवर्धनाचा जागर घुमला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ ः झाडे लावा, झाडे जगवा या संदेशाचा प्रत्यक्ष अवलंब करत ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला. केवळ झाडांची रोपे लावून नव्हे, तर प्रत्येक वृक्षाचे जतन करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा जागर या वेळी करण्यात आला.

ठाण्यात १२ राशींची झाडे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेद्वारे प्रतिवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी जागतिक पर्यावरणदिनी ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान, वृक्ष प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे आनंदनगर, घोडबंदर रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी नक्षत्र वन ही संकल्पना राबवत १२ राशींनुसार वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास माजी नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका साधना जोशी, उपायुक्त तायडे, सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक व ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नक्षत्र वन या संकल्पनेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून त्यांना ही कल्पना अत्यंत आवडली असल्याचे नागरिकांनी या कार्यक्रमात नमूद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84735 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top