
जागतिक पर्यावरण दिनाचा जागर
वसई, ता. ५ (बातमीदार) ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाने विविध रोपांची लागवड करत वृक्षांची निगा, संवर्धन राखण्याचे आवाहन करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वन परिमंडळाच्या सातिवली विभागाने परिसरात जांभूळ, वड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब यासह अन्य जातीच्या रोपांची लागवड विविध ठिकाणी केली. याप्रसंगी पंचायत समितीच्या सदस्या शुभांगी बेंद्रे, श्रमजीवी संघटनेच्या रमाताई वनगा, वनहक्क समितीचे दिनेश कटेला व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते. तसेच तुंगारेश्वर येथील चकाचक महाराज मंदिर ते श्री महादेव मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी येणाऱ्या पर्यटकांनी व भाविकांनी कचरा न करता हिरवागार परिसर सुंदर ठेवावा, तसेच वातावरणात होणारे बदल व वृक्षांची भविष्यात असलेली गरज आदींबाबत वसई वन विभागाने नागरिकांना सविस्तर माहिती देत वृक्ष लावा व जोपासा, असे आवाहन करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. या उपक्रमात वनपाल मनोज परदेशी, वनरक्षक रवी काळोखे, सुगंधा उमतोल, तसेच वन कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध जातीच्या रोपांची लागवड करताना नागरिकांना संदेश देण्याचा मानस होता. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत वृक्ष लागवड करण्याचे आश्वासन दिले.
- मनोज परदेशी, वनपाल, वसई
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84744 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..