
‘हॅपी स्ट्रीट''चा मोह खासदारांनाही अवरेना!
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः कल्याण-डोंबिवली शहरात दर रविवारी हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन केले जात आहे. कोरोना निवळल्यानंतर नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य सुधारावे व दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून आनंद लुटता यावा यासाठी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचा मोह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही आवरला नाही. रविवारी यात सहभागी होत त्यांनी पोलिसांच्या बॉलिंगवर जोरदार बॅटिंग केली.
नागरिकांनी रविवारी घरातून बाहेर पडून रस्त्यावर उतरत नृत्य, खेळ, योगा आणि संगीताच्या साथीने निरोगी आयुष्याकडे वाटचाल करावी. त्यांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकदेखील या उपक्रमात सहभागी होत धम्माल-मस्ती करत विविध खेळ खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
रविवारी कल्याण येथे पार पडलेल्या या उपक्रमात खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील सहभागी झाले होते. पोलिस व नागरिकांसोबत त्यांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. शहरात कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी आणि समाजस्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सतत झटणाऱ्या पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत अशा प्रकरचा आनंदमेळा सुरू केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. तसेच हा उपक्रम इतर शहरांतदेखील राबवण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84768 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..