आठ वर्षांच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठ वर्षांच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
आठ वर्षांच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

आठ वर्षांच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) ः आईसोबत स्कुटीवरून जाणाऱ्या आठ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला. ट्रकने ओव्हरटेक करताना स्कुटीला धडक दिली. या अपघातात आठ वर्षांची चिमुकली ट्रकखाली सापडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
शनिवारी रात्री आचल भूपेश नारवानी या त्यांची ८ वर्षीय मुलगी सायरा हिच्यासोबत शांतीनगरमार्गे कल्याण अंबरनाथ महामार्गावरून स्कुटीवरून घरी जात होत्या. आचल यादव डेअरी फार्मजवळ आल्या असता मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला धडक दिल्याने जखमी झालेल्या आचल बाजूला पडल्या. त्यांची मुलगी सायरा ही रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भूपेश नारवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीष वाघमारे यांनी ट्रकचालक विशाल यादव याला अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84782 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top