आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी!
आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी!

आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी!

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ६ (बातमीदार) ः जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानपुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हत्यांविरोधात शनिवारी (ता. ४) दुपारी ११.३० वाजता मुंबईत भेंडी बाजार येथील मिनारा मशीद परिसरात रझा अकादमीने शेकडो समर्थकासह ‘आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी आहोत,’ अशा घोषणा देत विघटनवादी अतिरेक्यांना निषेध केला.
पंडितांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नुरी म्हणाले की, आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे आहोत.
गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात विजय कुमार नावाच्या बँक व्यवस्थापकाची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
यापूर्वी जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील ३६ वर्षीय हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांची कुलगाममधील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या महिन्यात काश्मिरी पंडित कर्मचारी राहुल भट यांच्यासह दोन नागरिक आणि काश्मीरमध्ये ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला होता. आम्ही काश्मिरी पंडितांच्या सोबत आहोत, त्यांच्यावर होणारे प्राणघातक हल्ले आणि होणाऱ्या हत्यांचा जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारकडे या हत्याशी संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवण्यात येऊन त्यांना संपूर्ण सुरक्षा द्यावी अशी मागणी करीत आहोत, असे सुफी इस्लामिक बोर्डाचे फैसल बनारसवाला यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84788 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top