
बाळसई येथे आर सीटी च्या माध्यमातून बचत गटांनी घेतले प्रशिक्षण
रोहा, ता. ६ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन करण्यात आले असून, या माध्यमातून महिलांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय व उद्योगांकडे भरारी घेतली आहे. नागोठण्याजवळील बाळसई येथील बचत गटांना आरसीटीच्या माध्यमातून २० ते २९ मे या दहा दिवसांमध्ये वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
बाळसई गावात ५ बचतगट चांगल्या पद्धतीत कार्यरत असून त्यांना भविष्यात उद्योगधंद्यांमध्ये चांगली वाटचाल करता यावी, यासाठी स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड (बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत) तसेच उद्योजकता विकास साधना प्रेरणा प्रशिक्षणामार्फत वेगवेगळे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या दहा दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये तांदळाचे पापड, पोहे पापड, नाचणीचे पापड, मिश्र डाळीचे सांडगे, साबुदाणा बटाटा पापड, जवळ्याचे पापड, चहा मसाला, दूध मसाला, चाट मसाला, सांबर मसाला, कांदा-लसूण मसाला असे विविध पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण बचत गटाच्या महिलांना देऊन त्यांच्याकडून हे पदार्थ बनवून घेण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84805 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..