अर्थविश्व - वापरलेल्या वाहनांच्या विक्रीला यंदा वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थविश्व - वापरलेल्या वाहनांच्या विक्रीला यंदा वेग
अर्थविश्व - वापरलेल्या वाहनांच्या विक्रीला यंदा वेग

अर्थविश्व - वापरलेल्या वाहनांच्या विक्रीला यंदा वेग

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : कोरोना काळात भारतामध्ये वापरलेल्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याचे ड्रूम या संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीतील वाहनविक्रीचे प्रमाण ४४ टक्के आहे; तर ड्रूमद्वारे २०२२ मध्ये आतापर्यंत झालेल्या वाहनविक्रीत ५८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बीएस-४ वरून बीएस-६ मध्ये झालेल्या परिवर्तनामुळे नवीन गाड्यांच्या वाढलेल्या किमती, सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा आणि इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठीच्या पायाभूत यंत्रणांविषयी स्पष्टता नसणे आदी कारणांमुळे वापरलेल्या वाहनांची विक्री वाढल्याचे संस्थेने अहवालात म्हटले आहे. कोरोना काळ हा वापरलेल्या वाहन उद्योग क्षेत्रासाठी एक छुपे वरदान ठरले आहे. आगामी महिन्यांमध्ये ही वाढ अशीच कायम राहील, असा विश्वास ड्रूमचे संस्थापक आणि सीईओ संदीप अग्रवाल यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84806 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top