मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेच्या वतीने जनजागृती पत्रक वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेच्या वतीने जनजागृती पत्रक वाटप
मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेच्या वतीने जनजागृती पत्रक वाटप

मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेच्या वतीने जनजागृती पत्रक वाटप

sakal_logo
By

पेण, ता. ६ (वार्ताहर) : महाराष्ट्रातील मशिदींवर असणारे भोंगे बंद करण्यात यावेत, याकरिता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच संपूर्ण महाराष्ट्रात रान उठविले होते. त्या अनुषंगाने काही ठिकाणी भोंगे उतरविण्यात आले असून, काहींनी आवाजाची मर्यादा पाळली आहे; परंतु राज्यातील अनधिकृतपणे असणारे सर्व भोंगे कायम बंद होणे गरजेचे आहे. याकरिता पुन्हा मनसे सैनिकांनी घरोघरी जाऊन जनजागृती करून पत्रके वाटावीत, असे आदेश मनसे सैनिकांना असल्याने पेणमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच ग्रामीण भागासह शहरात पत्रकांचे वाटप केले. या वेळी तालुकाध्यक्ष रूपेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सपना देशमुख, उपाध्यक्ष छाया शिंदे, पेण शहर अध्यक्ष सुदेश संसारे, महिला अध्यक्षा निकिता पाटील, रेखा तांडेल, रमेश पाटील, श्रीराम पाटील, हनुमान नाईक, सचिन भोईर, गौरी औरा आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84808 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top