मुंबईत १२ जूनला ग्रीनथॉन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत १२ जूनला ग्रीनथॉन स्पर्धा
मुंबईत १२ जूनला ग्रीनथॉन स्पर्धा

मुंबईत १२ जूनला ग्रीनथॉन स्पर्धा

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत १२ जून रोजी ‘ग्रीनथॉन’ या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात १० हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. पर्यावरण रक्षणासाठी ही स्पर्धा असल्याने यातील विजेत्यांना पाच लाखांच्या बक्षिसांसह, सायकली, फूटबॉल व सीडबॉल-सीडपेन्सील दिल्या जाणार आहेत. तारामती ट्रस्टचे संचालक राज प्रकाश सुर्वे यांनी ही माहिती दिली.
‘धाव पर्यावरणासाठी, धाव जंगलांसाठी, धाव मुंबईसाठी, धाव झाडांसाठी’ अशी या स्पर्धेची घोषवाक्ये असतील. १० ते ६० वयोगटातील स्पर्धक यात सहभागी होऊ शकणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असून त्यानिमित्त १२ जून रोजी सकाळी सात वाजता राष्ट्रीय उद्यानातील त्रिमूर्ती मंदिरापासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. मुंबईतील नागरिकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे फुटबॉलप्रेमी असल्याने या खेळाचा प्रचार होण्यासाठी १० ते १८ वयोगटातील स्पर्धकांना फुटबॉल बक्षीस दिला जाईल. झाडे लावा-झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा अशी साद घालत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पर्यावरणप्रेमींना सीडबॉल आणि सीडपेन्सिलचे वाटप केले जाईल. त्यांच्या साह्याने मुंबईत रिकाम्या जागांवर, डोंगरांवर, बागांमध्ये हजारो झाडे लावता येतील, असेही राज सुर्वे म्हणाले. स्पर्धकांनी https://forms.gle/DvUZzvpZiUX५A४i३६ येथे पूर्वनोंदणी करावी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84826 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top