पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज
पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज

पावसाळ्यासाठी महापालिका सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी एकत्र मिळून समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सर्व विभागांना दिल्या. पावसाळ्यासाठी पालिका सज्ज झाली असून मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक सोमवारी स्थायी समिती सभागृहात झाली.

पालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीस पोलिस प्रशासन, महावितरण, एमआयडीसी, एमएमआरडीए, रेल्वे विभाग यांसह पालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मोठे नाले व छोटे नाले कटाक्षाने साफ करण्याबाबत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्याचप्रमाणे रेल्वे अंतर्गत येणारे नाले साफसफाई करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेचा अग्निशमन विभाग अग्निशमन वाहने, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट व इतर सामग्रीसह सुसज्ज असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये २३५ धोकादायक इमारती आहेत आणि गेल्या वर्षभरात यापैकी १३८ इमारती निष्कासित करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींपैकी ७६ इमारतींमध्ये रहिवासी आहेत. या रहिवाशांना पोलिस विभाग व महसूल विभागाच्या मदतीने सतर्क करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. पालिकेकडून संबंधित रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

फ्लड सेन्सर्सद्वारे अलर्ट
एसकेडीसीएलमार्फत पूरप्रवण क्षेत्रात १० ठिकाणी फ्लड सेन्‍सर्स बसवले असून येथे पाण्याची पातळी वाढल्यास अलर्ट संदेश पालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रूममध्ये प्राप्त होईल. पालिका क्षेत्रात एकूण २८ ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम बसवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीमार्फत पालिका मुख्यालयात त्याचप्रमाणे पोलिस उपआयुक्त कार्यालयात बसविलेल्या नियंत्रण कक्षाद्वारे आपत्कालीन परिस्थितीचे निरीक्षण करणे सुलभ होणार असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84854 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top