घोटगावात सहा लाखांची घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटगावात सहा लाखांची घरफोडी
घोटगावात सहा लाखांची घरफोडी

घोटगावात सहा लाखांची घरफोडी

sakal_logo
By

पनवेल, ता. ६ (वार्ताहर) : तळोजा येथील घोटगावातील इमारतीत घरफोडी करून सहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काशीनाथ बाविस्कर (वय ६२) हे तळोजा घोटगाव येथील अरिहंत अन्शुना या इमारतीत पत्नीसह राहण्यास आहेत. बाविस्कर व त्यांची पत्नी हे दोघेही २९ मे रोजी आपल्या मुलीच्या घरी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून दोन लाख १० हजार रुपयांच्या रोख रकमेसह दागिने असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84872 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top