पावसाळी खरेदीलाही महागाईची झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळी खरेदीलाही महागाईची झळ
पावसाळी खरेदीलाही महागाईची झळ

पावसाळी खरेदीलाही महागाईची झळ

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) ः राज्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याने शहरात रेनकोट आणि रंगबेरंगी छत्र्या, प्‍लास्‍टिक पत्रे, बॅग कव्हर, ताडपत्री खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या कित्येक व्यावसायिकांनी आपली दुकाने गुंडाळली होती. मात्र आता पुन्हा बाजारपेठा सजल्‍या आहेत. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाचा भडका उडाल्याने छत्री, रेनकोटच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
जिल्‍ह्यात अनेक खासगी शाळा सोमवारपासून सुरू झाल्‍या आहेत; तर पुढील आठवड्यापासून सरकारी शाळांची घंटा वाजणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांच्या पावसाळी खरेदी सुरू केली आहे. रेनकोट किंवा छत्री घेतल्याशिवाय नोकरदार वर्ग, विद्यार्थी घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्रीच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री व रेनकोटचे दर १५ ते २० टक्‍क्‍यांनी वधारले आहेत.
नवी मुंबईतील बहुतांश व्यापारी भिवंडी परिसरातील कारखान्यांतून बनवलेल्या छत्र्या विक्रीसाठी बाजारात आणतात. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. याशिवाय मेटल, पॅकिंग पेपर महागल्याने यंदा पावसाळी खरेदीत नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

विविध आकाराच्या रंगीबेरंगी छत्र्या
युवावर्गात विविध रंगाच्या छत्र्यांची क्रेझ असते. बाजारात प्रिंटेड, एक, दोन, तीन फोल्‍डिंग, आर्मी सिल्वर, रेम्बो, मल्टीकलर, फॅमिली पॅक व गार्डन छत्री, पारदर्शक, पॉकेट छत्री, हॅट अम्‍ब्रेला उपलब्‍ध आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रेनकोटमध्ये यंदा कार्टून कॅरॅक्टर व फ्लोरोसेंट रंगाच्या छत्र्यांना पसंती दर्शविण्यात येत आहे.

इंधन, वाहतूक, मेटल व कापड यांचे भाव वाढल्यामुळे पावसाळी साहित्याचे दर वाढले आहेत. मात्र आपल्‍याकडे पाऊस जास्‍त असल्‍याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
- सुरेश चौधरी, व्यापारी


असे वाढले दर
प्रकार गतवर्षी यंदा
मोठी छत्री २०० ते २५० रुपये २५० ते ३०० रुपये
फोल्डिंग छत्री २०० ते ३०० रुपये २५० ते ३२५ रुपये
बेबी अम्ब्रेला १०० ते १५० रुपये १४० ते २०० रुपये
गार्डन अम्ब्रेला १५०० ते १८०० रुपये २३०० ते २७०० रुपये

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84900 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top