नवी मुंबईत पहाटेपर्यंत छमछम सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत पहाटेपर्यंत छमछम सुरूच
नवी मुंबईत पहाटेपर्यंत छमछम सुरूच

नवी मुंबईत पहाटेपर्यंत छमछम सुरूच

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विशेषत: गावठाण आणि एमआयडीसी भागात नियमांना बगल देत पहाटेपर्यंत डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या आणि अनधिकृतपणे राजरोसपणे लेडीज बारवर काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली होती; परंतु नवी मुंबईत मात्र बारमध्ये चालणाऱ्या अनेक गैरप्रकारांवर पोलिस कानाडोळा करत आहे.

नवी मुंबईतील दिघा ते बेलापूर पट्टा, रबाळे ते तुर्भे एमआयडीसी आणि तुर्भे, शिरवणे, कोपरखैरणे गावठाण भाग, पनवेलमधील भरवस्तीत बार सुरू आहेत. वरदहस्त असलेल्या मोठ्या बारमध्ये तर पहाटे पाच वाजेपर्यंत गाणी आणि नृत्याचा ठेका, तसेच डान्सबारमध्ये मुलींवर पैसा उडवला जात आहे. विशेष म्हणजे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डझनभर पुरावे देऊनही पोलिस मात्र त्या पुराव्यांना दफ्तरी बंदिस्त ठेऊन बारमालकांना अभय देत असल्याने छमछम झिंगाट हा वाढतच चालला आहे. डान्स बारचालकांकडून नियमांचे पालन केले जात नसून अनेकदा पोलिस नियमांवर बोट ठेवून कारवाई करतात; परंतु नियमानुसार चालणाऱ्या बारपेक्षा नियमबाह्य वेळेतील बारवर पोलिस सहसा धजावत नाहीत. त्यामुळे बारविरोधात नवी मुंबई पोलिसांची कारवाई मोहीम थंडगार पडली आहे की काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
लेडीज बारची वेळ रात्री ९.३० वाजेपर्यंत आणि ऑर्केस्ट्रा बारला मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत परवानगी असताना पहाटेपर्यंत सर्रास बार हे सुरू आहेत. नुकतेच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहूनदेखील यासंदर्भात माहिती दिली आहे.

डान्सबार हे रात्रीच्या नियमांचे उल्लघंन करून सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गुन्हे शाखेलादेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
- बिपिन कुमार सिंह, आयुक्त, नवी मुंबई पोलिस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84911 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top