
एन.टी.सी.च्या कामगारांत असंतोष खदखदतोय
वडाळा, ता. ७ (बातमीदार) ः महाराष्ट्रासह देशभरातील केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील २३ गिरण्या कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आल्या. या गिरण्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रोजगार गमावलेल्या १० हजार कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली त्यांची कुटुंबे मिळून जवळपास ३० हजार पीडित गेली दोन वर्षे उपासमारीचे जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील एन.टी.सी. कामगारांच्या असंतोष खदखदताना दिसतो आहे. तेव्हा हा असंतोष कोणते वळण घेईल, हे सांगता येत नाही, असे मत माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी सोमवारी (ता. ६) मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
देशात नऊ राज्यांमध्ये एन.टी.सी. गिरण्या आहेत. त्यांच्या प्रश्नावर संघटितपणे लढण्यासाठी कामगार नेते माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पुढाकार घेतला आहे. त्याप्रमाणे इंटक, आयटक, सिटू, भारतीय कामगार सेना, एलपीएस, एचएमएस या केंद्रीय संघटनांशी संलग्न असलेल्या त्या त्या राज्यातील कापड उद्योगामधील कामगार संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समन्वय कृती समितीची स्थापना करण्यात आली. त्याच्या अध्यक्षपदी सचिन अहिर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली संसदेसमोर आंदोलनही छेडण्यात आले होते.
...
आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रश्नी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही या प्रश्नावर भेटीची वेळ मागण्यात आली आहे. एवढे सारे करूनही केंद्र सरकार या एन.टी.सी. गिरण्या सुरू करण्याबाबत सकारात्मक राहणार नसेल, तर गिरणी कामगार रस्त्यावर येतील, असा इशारादेखील सचिन अहिर यांनी दिला आहे.
...
मार्च २०२० पासून एन.टी.सी. बंद करण्यात आल्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे. कोट्यवधी रुपयांची जमीन वापराअभावी पडून आहे. या सर्व गिरण्यांचे आधुनिकीकरण करणे काळाची गरज आहे.
- सचिन अहिर, नेते
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84920 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..