वसई-विरारमध्ये इच्छुक लागले कामाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमध्ये इच्छुक लागले कामाला
वसई-विरारमध्ये इच्छुक लागले कामाला

वसई-विरारमध्ये इच्छुक लागले कामाला

sakal_logo
By

वसई, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना, आरक्षण सोडत जाहीर झाल्याने कोणत्याही क्षणी निवडणुकीची तारीखही निश्चित होऊ शकते. त्यामुळे आपले प्रभाग पिंजून काढण्यासाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी प्रशासकांकडे विकासकामांचा पाठपुरावाही सुरू केला आहे. पाणी, रस्ते, गटारे, उद्याने, स्मशानभूमी, पावसाळी कामे, सुशोभीकरण, खेळाची मैदाने यासह अन्य मूलभूत सुविधांबाबत प्रभागातील परिस्थितीची पाहणी करून काम तडीस नेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
वसई-विरार पालिकेच्या एकूण ४२ प्रभागांत प्रत्येकी तीन सदस्य निवडणूक येणार आहेत. पालिकेचे प्रभाग मोठे असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान इच्छुकांना आहे. प्रभागाची रचना बदलल्याने नव्या मतदारांसमोर इच्छुकांना जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील इच्छुक प्रयत्न करत आहेत. प्रभागात रस्तेदुरुस्तीसह पिण्याच्या पाण्याची असलेली समस्या निकाली लावली जात आहे. कोरोना काळापासून आजतागायत पालिकेवर प्रशासक नियुक्त आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपले विषय मांडणे, चर्चा करणे, महासभा घेणे यापासून अलिप्त राहावे लागत असले, तरी प्रशासकांकडे कामाचा लेखाजोगा मांडला जात आहे.

निवडणुका आल्यावरच आम्ही काम करत नाही, तर इतरही वेळी आम्ही कार्यतत्पर असतो. अनेक विकासकामांचा पाठपुरावा पालिका, राज्य सरकारकडे करत आहोत. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या निकाली लावल्या आहेत.
- नारायण मानकर, माजी महापौर

पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, गटारे अशी अनेक कामे तडीस नेली जात आहेत. नागरिक संपर्कात असतात व त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जातो. पालिकेत प्रशासक असले, तरी कामे करण्याकडे आमचा कल असतो.
- किशोर धुमाळ, माजी नगरसेवक

विकासकामे पूर्ण व्हावीत, यासाठी पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो. महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यावरही अनेक खोळंबलेली कामे पूर्ण केली आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात.
- पंकज पाटील, माजी नगरसेवक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84927 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top