नेरूळमधील पाणथळी जागांचे संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरूळमधील पाणथळी जागांचे संवर्धन
नेरूळमधील पाणथळी जागांचे संवर्धन

नेरूळमधील पाणथळी जागांचे संवर्धन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो शहर म्हणून घोषित केल्यानंतर शहरातील जैवविविधता वाचवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नेरूळ येथील डीपीएस तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य येथील पाणथळींचे संवर्धनाच्या दिशेने महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. येथील पाणथळ जागा महापालिकेने सिडकोतर्फे हस्तांतरित करून घ्यावी, अशी मागणी नेट कनेक्ट आणि बॉम्‍बे नॅचरल हिस्‍ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणवादी संस्थांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
महापालिका मुख्यालयासमोर डीपीएस शाळेजवळ नैसर्गिक तलावात हजारो फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास आहे. येथील सुमारे ३० एकर परिसरात विविध दुर्मिळ जीव नजरेस पडतात. त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांव्यतिरिक्त अन्य पक्षीही याठिकाणी विहार करताना दिसतात.
पावसाळ्यानंतर उन्हाळ्यापर्यंतचा प्रवासी पक्ष्यांना हंगाम पक्षी निरीक्षकांसाठी एक पर्वणीच असतो. त्यामुळे या जागांचे संवर्धनासोबत संरक्षण सुद्धा व्हावे, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांकडून होत आहे. पाणथळी जागा ताब्यात घेऊन त्यांचे संवर्धन करण्यासाठी नेटकनेक्ट फाऊंडेशनतर्फे महापालिकेकडे मागणी करण्यात आली आहे. त्याला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत डीपीएस तलाव फ्लेमिंगो अधिवासाचे क्षेत्र असून त्याचे संवर्धन करण्यासाठी बीएनएचएससोबत एकत्र काम करण्याबाबत आश्वासन दिले. डीपीएस तलावावर दरवर्षी सुमारे पाच हजार फ्लेमिंगो पक्षी उतरतात, अशी माहिती बीएनएचएस या संस्थेकडे आहे. गरज पडल्यास या पाणथळींच्या संवर्धनासाठी कांदळवने कक्षाचीही मदत घेऊ, असे नेट कनेक्टसोबत झालेल्या बैठकीत बांगर यांनी सांगितले.
बीएनएचएस संस्थेने केलेल्या संशोधन अहवालानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) वन्यजीव वाचवण्यासाठी पाणथळींचे संवर्धन होण्याची गरज व्यक्त केली आहे. एनआरआय-टीएस चाणाक्य जलस्रोतावर पाणथळ असल्याचा शिक्कामोर्तब झाला आहे. आम्ही बीएनएचएस अहवाल आणि मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाची प्रत सादर केली होती, अशी माहिती नेटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी दिली.

पाणथळ क्षेत्रावर गोल्फ कोर्स उभारण्याची सिडकोची योजना असून उच्च न्यायालयाने मंजुरी दिली नाही. पाणथळ संवर्धनाविषयी अतिशय आग्रही असून गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याच्या बाजूने असल्याची ग्वाही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याआधीच नेटकनेक्टला दिली. शिवाय गोल्फ कोर्स रद्दबादल झाल्याचे आणि पाणथळ क्षेत्र बीएनएचएस योजनेनुसार संरक्षित करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित (एनएमआयएएल) कडून पर्यावरण मंजुरीकरिता करण्यात आलेल्या अर्जात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
- बी.एन.कुमार, नेट कनेक्ट फाऊंडेशन, संचालक

शहरात येणाऱ्या फ्लेमिंगोचे अधिवास वाचवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नेट कनेक्ट संस्थेकडून महापालिकेकडे पाणथळ संवर्धन व संरक्षणाचा प्रस्ताव आला आहे. डीपीएस तलावाजवळील सेवा रस्ता महापालिकेच्या अखत्यारित येतो. याठिकाणी येणाऱ्या लोकांना चांगल्या सेवा देण्याचे महापालिकेचे कर्तव्य आहे.
- अभिजित बांगर, आयुक्त

फ्लेमिंगो त्रास न देण्याचा सल्‍ला
जैवविविधतेने समृद्ध असलेल्या क्षेत्राचे रक्षण करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. पाणथळ क्षेत्राला भेट देणाऱ्या नागरिकांनी पक्ष्यांना त्रास देऊ नये, छायाचित्रात पक्षी उडावे म्हणून काही सेल्फी बहाद्दर पक्ष्यांना दगड मारतात हे चुकीचे आहे. हे पक्षी चिखलात रुतण्याची शक्यता असल्याने या भागात फिरण्यासाठी येणाऱ्यांनी पक्ष्यांच्या फार जवळ जाऊ नये, असा सावध सल्लाही पक्षी तज्ज्ञ देतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84958 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top