वावर-हरसूल रस्त्यावर दारू तस्करी रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वावर-हरसूल रस्त्यावर दारू तस्करी रोखली
वावर-हरसूल रस्त्यावर दारू तस्करी रोखली

वावर-हरसूल रस्त्यावर दारू तस्करी रोखली

sakal_logo
By

मनोर, ता. ७ (बातमीदार) ः जव्हार तालुक्याच्या वावर गावच्या हद्दीतील वावर-हरसूल रस्त्यावर दमण बनावटीच्या विदेशी दारूच्या तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या विदेशी दारूच्या साठ्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पथकाने इको कारसह आठ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जव्हार तालुक्यातील वावर-हरसूल रस्त्यावरील गावच्या हद्दीत सापळा रचला होता. मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील संशयास्पद इको (एमएच १५ एचजी ८११३) कारचा पाठलाग करून कारची तपासणी केली असता कारमध्ये दमण बनावटीचा मोठा दारूसाठा आढळून आला. दारूचा साठा केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली येथील अनिल किशना खांजोडे नामक व्यक्तीने पुरवठा केल्याची माहिती देण्यात आली. त्याला पोलिसांनी फरार घोषित केले आहे. संतोष मुरलीधर नागरे आणि निवृत्ती सुधाकर जाधव (दोघे रा. त्र्यंबक, जिल्हा नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर, भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g84989 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top