पेणचे गणपती थायलंडला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेणचे गणपती थायलंडला रवाना
पेणचे गणपती थायलंडला रवाना

पेणचे गणपती थायलंडला रवाना

sakal_logo
By

पेण, ता. ७ (वार्ताहर) : राज्यासह देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पेणच्या जगप्रसिद्ध गणेशमूर्ती तीन महिने आधीच परदेशात जाऊन पोहोचल्या आहेत. येथील गणेशमूर्ती चार दिवसांपूर्वी थायलंडला रवाना झाल्या आहेत.

गणेशोत्सवाला अजूनही तीन महिने शिल्लक असले, तरी गणेशमूर्तींच्या खरेदी-विक्रीसाठी गणेशभक्तांसह व्यापाऱ्यांची आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे गणपतीचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे. येथील मूर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध होतात. अमेरिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, मलेशिया, इंग्लंड यांसारख्या देशांसह आता या गणेशमूर्ती थायलंडपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. चार दिवसांपूर्वीच पेणमधील कुंभार आळीतील राहुल कला केंद्रांतून अगदी दीड फुटांपासून ते सहा फुटापर्यंतच्या शेकडो गणेशमूर्ती थायलंडला रवाना झाल्या आहेत.
या मूर्ती जूनच्या अखेरीस थायलंडला पोहोचतील. साधारणपणे तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत या मूर्ती विकल्या जातील, असे राहुल कला केंद्राचे मालक राहुल जितेकर यांनी सांगितले.
------
आपण कोरलेल्या मूर्ती परदेशात जातात. त्यामुळे आमच्या मेहनतीला यश मिळाले आहे, असे वाटते. भाविकांची या वर्षी जशी मागणी होती, तशीच पुढल्या वर्षीही मिळावी, अशी प्रार्थना आम्ही सर्व कारागीर बाप्पाजवळ करतो.
- राहुल जितेकर, मूर्तिकार, राहुल कला केंद्र

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85006 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top