‘बिग बी’च्या बंगल्याला लोखमोलाचे संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बिग बी’च्या बंगल्याला लोखमोलाचे संरक्षण
‘बिग बी’च्या बंगल्याला लोखमोलाचे संरक्षण

‘बिग बी’च्या बंगल्याला लोखमोलाचे संरक्षण

sakal_logo
By

किरण कारंडे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई महापालिकेपासून ते रेल्वे प्रशासनापर्यंत सर्वच यंत्रणांकडून आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगाने पूर्वतयारी केली जात आहे. अशाच प्रकारची तयारी बॉलीवूड कलाकारांकडूनही केली जात आहे. पावसाळ्यात गळक्या छताच्या अडचणीपासून बचाव करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ‘जलसा’ आणि ‘जनक’ बंगल्याला ताडपत्रीचे आच्छादन केले आहे. पावसाळ्याच्या चार ते पाच महिन्यांसाठी पाच लाख रुपये भाडे आकारण्यात आले आहे.
जुहू तारा रोडवर बिग बी अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ हा १० हजार चौरस फुटांचा; तर ‘जनक’ हा बंगला आठ हजार चौरस फुटाचा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या ‘जलसा’ आणि जनक हे दोन्ही बंगले ताडपत्रीने झाकण्यात आले आहेत. जवळपास दोन हजार बांबूंचा वापर करत हा ‘जलसा’ बंगला आच्छादित करण्यात आला आहे. बच्चन कुटुंबीयांचे वास्तव्य असलेल्या या बंगल्यावर आच्छादनासाठी पारदर्शक ताडपत्रीचा वापर करण्यात आला आहे. ‘जनक’ बंगलाही ताडपत्रीने आच्छादित केला असून तिथे बिग बींचे ऑफिस, जिम्नॅशियम तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे.
पावसाळ्यात जून महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत दोन्ही बंगल्यांवर ताडपत्रीचे आच्छादन ठेवण्यात येणार आहे. १० हजार चौरस फुटांच्या ‘जलसा’ बंगल्यावर मंडप टाकण्यासाठी कंत्राटदाराने जवळपास पाच लाख रुपये भाडे आकारल्याची माहिती आहे. तसेच सध्या बच्चन यांच्या बंगल्याच्या छताच्या सिलिंगच्या कामासोबतच रंगरंगोटीही करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
---
जय-विरूचा कंत्राटदार एकच
बंगल्यात पावसाचे पाणी शिरू नये म्हणून अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ आणि ‘जनक’ या दोन्ही बंगल्यांवर ताडपत्रीचे आच्छादन केले. अशाच प्रकारे धर्मेंद यांच्या बंगल्यावरही मंडप टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे बिग बी आणि धर्मेंद्र यांच्या बंगल्यांवर ताडपत्री टाकण्याचे काम एकाच कंत्राटदाराने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85027 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top