भिवंडीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
भिवंडीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

भिवंडीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) ः भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आता स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार (ता. ८) सकाळी ९.०० ते गुरुवार (ता. ९) सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार आहे.

भिवंडी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडे व लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी चव्हाण कॉलनी येथील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची गाडी रस्त्यामध्ये अडवून त्यांना जाब विचारला होता. अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने व मुबलक पाणी मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. अशातच आता स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारपासून २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आलेला आहे. पावसाळ्या अगोदर दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याकरीता स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा या काळात बंद राहणार आहे. पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिका पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता एल. पी. गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g85031 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top